
श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा सरवडे मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सरवडे या गावी तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पहिल्या दिवशी चित्रकला स्पर्धा, दुसऱ्या दिवशी दुपारी गावातील सर्व तरुण मंडळानी मोटरसायकल रॅली काढून, संध्याकाळी गावातून भव्य रॅली काढली,प्रभू श्रीराम, माता सीतामाई, श्री लक्ष्मण यांची वेषभुषा करून या रॅलीत मोठया प्रमाणात सहभागी होऊन यांची राथातुन मिरवणूक काढण्यात आली.
मुख्यदिवशी 22 जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता श्रीराम मंदिर येथील श्री राम मूर्तीस महा अभिषेक घालण्यात आला. यावेळी चिमुरड्यांनी राम लक्ष्मण सीता हनुमान यांच्यासह रामायणातील अनेक पात्रांची वेशभूषा केली होती शोभायात्रा नाका नंबर एक पासून राम मंदिर इथपर्यंत काढण्यात आली यानंतर लहान मुलांनी नृत्य आविष्कार सादर केला यानंतर महिलांसाठी सामुदायिक रामरक्षा पठण घेण्यात आले.
आयोध्या येथील राम मंदिर मध्ये प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीवर आयोध्या येथून आलेल्या अक्षदा वाहण्यात आल्या त्यानंतर पुष्पवृष्टी करून महाआरती करण्यात आली यानंतर हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला, सकाळी 11:00 वाजता महाप्रसाद चे नियोजन करून 4000 लाडूंचे वाटप भावीक भक्तांना करण्यात आले संध्याकाळी चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ पार पडला यानंतर दीपोत्सव आतिशबाजीसह साऊंड लावून हा सोहळा साजरा करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन वाय.के. वाईंगडे , राजेंद्र शेटके , ह.भ. प. बाजीराव पाटील, ह.भ.प शिवाजी वागवेकर, सचिन पाटील,सचिन वागवेकर, सचिन लाड, सागर वागवेकर, महेश गुळवणी डॉ.जे.के पाटील, तुकाराम कुंभार, पोपट पवार, शांताराम पाटील, रवी बुजरे इ. भक्तांचे मोठे सहकार्य लाभले, त्याचबरोबर या कार्यक्रमाला राधानगरीचे आमदार प्रकाशरावजी आबिटकर, सरवडे गावचे लोकनियुक्त सरपंच रणधीरसिंह मोरे, युवा नेते मानसिंग पाटील यांनी भेट दिली. आकर्षक रांगोळी काढून तसेच घराघरात गोड पदार्थांचे सेवन करून नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला त्याचबरोबर शहरांमध्ये संपूर्ण दिवस मांसाहार बंद ठेवण्यात आला होता.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री हनुमान भक्त मंडळ व गावातील सर्व तरुण मंडळी केले..


