Home Uncategorized कुंभोज येथे आमदार अशोकराव माने यांच्या निधीतून रस्त्याच्या कॉक्रीटीकरणासाठी 10 लाखांचा निधी मंजूरवारणा संचालक अरुण पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कामाचा शुभारंभ

कुंभोज येथे आमदार अशोकराव माने यांच्या निधीतून रस्त्याच्या कॉक्रीटीकरणासाठी 10 लाखांचा निधी मंजूरवारणा संचालक अरुण पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कामाचा शुभारंभ

3 second read
0
0
128

कुंभोज (ता. हातकणगले) : हातकणगले मतदारसंघाचे दलितमित्र आमदार अशोकराव माने यांच्या स्थानिक विकास निधीतून कुंभोज गावातील कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा ते भूपाल शिंदे यांचे घर या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या विकासकामाचा शुभारंभ आमदार अशोकराव माने यांच्या शुभहस्ते, तसेच जिल्हा परिषद सदस्य व वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. या कामासाठी अरुण पाटील यांच्या विशेष प्रयत्नांचे गावकऱ्यांतून कौतुक करण्यात येत आहे.

कार्यक्रमाला संभाजी मिसाळ, चांद मुजावर, सदानंद महापुरे, अमोल गावडे, सागर सुवासे,अनिल गायकवाड, संतोष भोकरे, आप्पासो चौगुले, संदेश भोसले, अनिल कोरे, सागर कांदेकर, श्रीपाल कोळी, बाबासो डोने, दिलीप दशवंत, विक्रम खराडे, लखन भोसले, सचिन शिंदे, राहुल कत्ते, राजू घोदे, राजू पांडव, सुभाष देवमोरे, सुशांत पाटील, अरुण जमणे, मुबारक मुजावर, कॉन्ट्रॅक्टर सागर पुजारी, संदीप तोरस्कर, मधुकर घोदे, योगेश पाटील यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हातकणंगले प्रतिनिधी, सचिन लोंढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…