Home Uncategorized कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मंजूर करून आणलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून विविध प्रभागांमध्ये रस्ते आणि गटारींच्या कामाला सुरवात.

कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मंजूर करून आणलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून विविध प्रभागांमध्ये रस्ते आणि गटारींच्या कामाला सुरवात.

6 second read
0
0
166

दि.२२/१२/२०२४

खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून काही रस्ते पूर्ण झाले आहेत. तर काही रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. कृष्णराज महाडिक यांनी आजी-माजी नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकार्‍यांसह झालेल्या रस्त्यांची पाहणी केली. तसेच नव्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभही केला. विशेष म्हणजे रोड रोलर चालवत कृष्णराज यांनी रस्त्याच्या कामात प्रत्यक्ष सहभागही घेतला.
कोल्हापुरातील रस्त्यांच्या अवस्थेबाबत बोलण्यासारखी स्थिती राहीलेली नाही. त्यामुळे शहरातील रस्ते टकाटक व्हावेत, वाहनधारकांना प्रवास करताना कोणताही त्रास होवू नये, या हेतूने खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णराज महाडिक यांनी राज्य सरकारकडून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून काही प्रभागातील रस्ते पूर्ण झाले आहेत. तर काही रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. कृष्णराज महाडिक यांनी शहरात प्रत्येक प्रभागात फिरून रस्त्यांच्या कामाची माहिती घेतली. पुर्ण झालेल्या कामाच्या दर्जाचीही तपासणी त्यांनी केली. तर अनेक प्रभागातील रस्त्यांच्या आणि गटारीच्या कामांचा शुभारंभ त्यांच्या उपस्थितीत झाला. प्रभाग क्रमांक ३९ राजारामपुरी एक्सटेंशन अंतर्गत मंडलिक पार ते भाटघर गटर चॅनलच्या कामासाठी १५ लाख रुपये मंजुर झाले आहेत आणि राजारामपुरी एक्सटेंशन परिसरात गटार चॅनल तसंच रस्ता डांबरीकरणासाठी ३५ लाख रुपये मंजूर आहेत. त्याचप्रमाणं गंगातीर्थ रस्ता डांबरीकरणासाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. त्याचा शुभारंभ कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते आणि प्रा. जयंत पाटील, विलास वास्कर, राजसिंह शेळके, भाग्यश्र्ी शेटके, किरण नकाते, करण जाधव, अभिजीत शिंदे, उमा इंगळे, शैलेश पाटील, राहुल जोशी, विराज चिखलीकर, अमर साठे, संगीता खाडे, गिरीश साळोखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होणार असून गटार व्यवस्थेसह रस्त्याचे डांबरीकरण होवून, रहदारी सुरळीत होईल, असे कृष्णराज महाडिक म्हणाले. तर प्रभाग क्र. ३४ शिवाजी उद्यम नगर अंतर्गत मूलभूत सुविधांच्या विकासासाठी २५ लाख रुपये निधी देण्यात आलाय. त्यातून या परिसरातील गटारींचे बांधकाम होणार आहे. त्याचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी अजित मोरे, मोहन जाधव, अक्षय शिंदे, बाळासाहेब मुधोळकर आणि प्रणित व्हनाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ३८ टाकाळा खण, माळी कॉलनीतील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झालाय. त्यामध्ये परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. तसंच म्हसोबा मंदिर ते राजमंदिर आईस्क्रीम आणि शिंदे घर पर्यंत ९ इंची गटर बांधणीसाठी २० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर झालाय. त्याचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी करण जाधव, अविनाश भोसले, अभिजीत भोसले, मयूर माने, चेतन शहा, स्वप्नील कुंदनकर, जयराज देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्याचप्रमाणं यादव नगरमधील अंतर्गत कॉलन्यातील विविध ठिकाणी गटार बांधकामासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय.

त्याचा शुभारंभ विशेष कार्यकारी अधिकारी प्रेमसिंग रजपूत, रविकिरण गवळी, सुरज पाटील, संदिप साठे, नितीन पाटील, अभिषेक सूर्यवंशी, नागेश पोवार, अर्जुन दिंडे, निलेश पाटील, सत्यम चौगुले, रणजित औंधकर, चौधरी भाई मुजावर, शिवराज रजपूत, मंगलताई निपाणीकर, साजिद मुल्ला, पप्या पाटील यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यादवनगरमधील रस्त्यांच्या कामाबाबत तिथल्या नागरिकांशी भारतीय बैठक मारून कृष्णराज महाडिक यांनी चर्चा केली. या निधीमुळं यादव नगर परिसरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान प्रभाग क्रमांक ४७ फिरंगाई अंतर्गत फिरंगाई तालीम जवळील परिसरात गटार बांधकामासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. त्याचा शुभारंभ उत्तम कोराणे, सचिन पवार, विश्वास पवार, गिरीश साळुंखे, प्रकाश सरनाईक, संग्राम जरग, मनोज निकम, बळी भोसले, सतीश तेलके, सतीश पाटील, अभिजीत गायकवाड, इंद्रजीत महाडेश्वर आणि चेतन साळुंखे यांच्या उपस्थितीत झाला. तर प्रभाग क्रमांक ६ पोलीस लाईन परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी १५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. तर कसबा बावडयातील अंतर्गत बिरंजे पाणंद शाहू सर्कल परिसरात गटर बांधण्यासाठी २० लाख रुपये निधी मंजूर केलाय.

त्याचा शुभारंभ किरण शिराळे, चंद्रकांत घाडगे, प्रदीप उलपे, सचिन पवार, धीरज उलपे, किसन खोत, अमर साठे, प्रदीप मगदूम जी, रावसाहेब चौगुले, किशोर पवार, संतोष जाधव, बाबा चव्हाण, रावसाहेब चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…