Home Uncategorized वारणा दूध संघाची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

वारणा दूध संघाची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

3 second read
0
0
70

वारणा दूध संघाची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज वारणानगर येथील वारणा शिक्षण मंडळाच्या सभागृहात पार पडली.सभेला दिपप्रज्वलंनाने सुरुवात झाली. या सभेचे स्वागत प्रास्ताविक संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी केले,तर संघाचे संचालक शिवाजी मोरे यांनी दिवंगत सभासद, इतर मान्यवरांचा श्रद्धांजलीचा ठराव मांडला. यावेळी बोलताना वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दूध संघ आणि दूध व्यवसाय यांच्यासमोरील आव्हान आणि नवीन संधी याविषयी बोलताना वारणा दूध संघ दरवर्षी बाहेरच्या भागातून दूध आयात करत असतो त्याला पर्याय म्हणून कार्यक्षेत्रामध्येच दूध उत्पादन वाढाव म्हणून प्रयत्न करत असल्याचे सांगीतले. जे पशूपालक मध्यप्रदेश मधून म्हैसाणा आणि मुऱ्हा जातीच्या म्हेशी आणत असतात त्यांना वारणा दूध संघावरच या म्हैशी उपलब्ध करून देणार असल्याच सांगीतल, त्याचबरोबर म्हैशी खरेदी करणेसाठी 70 हजार रुपयांच अनुदान देणार असल्याच जाहीर केल. या अनुदानापोटी ३५ हजार रुपयांचे पशुखाद्य, तीस हजार रुपये तीन वर्ष्यानंतर प्रत्यक्ष गोट्यावर म्हैशीच संगोपन होत असल्याच पाहून आणि ५ हजार रुपयाचा विमा अशा स्वरूपात देण्यात येणार आहे,त्याच बरोबर दूध संघान उत्पादन क्षेत्रात ही अमुलाग्र बदल केला असून दोन प्लेव्हर श्रीखिंड आणि ९ प्लेव्हर मधील आईसक्रीम येत्या महीन्या भरात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देणार असल्याच सांगीतल.त्याचबरोबर उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी १० टनाचा दही, १० टनाचा पनीर आणि सुगंधी दूध पॅकींग प्लांट उभा करणार असल्याच सांगीतल, यावेळी दूध संघाला 49 कोटी रुपये निव्वळ नफा झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतल.यावेळी दूध संघाला म्हैस आणि गायीचे जादाचा दूध पुरवठा करणाऱ्या वारणा दूध संघांच्या कार्यक्षेत्रातील विविध दूध संस्थाचा आणि उत्पादकांचा सत्कार आ. डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्वसाधारण सभेच कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी अहवाल वाचन केले. विषय पत्रीकेवरील सर्व विषयास सभासदांनी यावेळी सर्वानुमते मंजूरी दिली. यावेळी वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष उत्तमराव पाटील, संचालक प्रमोद कोरे, चार्टर्ड अकाऊंटंट रणजित शिंदे यांच्यासह सर्व संचालक आणि वारणा समूहातील पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…