Home Uncategorized सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा

सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा

4 second read
0
0
273

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त गोकुळ शिरगांव येथील सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश स्कूलमध्ये आज मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून दिंडीची शोभा वाढवली, त्यामुळे शाळेचे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

सकाळी ९ वाजता दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला. ‘विठ्ठल हरी नामाचा’ गजर करत विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या गाण्यांवर ठेका धरत आनंदोत्सवात दिंडी काढली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा पारंपरिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. चिमुकल्या वारकऱ्यांनी कपाळावर गंध, धोतर, डोक्यावर विठ्ठलाचा मुकुट परिधान करून हातात टाळ वाजवत दिंडीत सहभाग घेतला. तर मुलींनी रंगीबेरंगी साड्या परिधान केल्या होत्या आणि हातात तुळशी वृंदावन घेऊन विठूरायाचे नामस्मरण करत होत्या, ज्यामुळे शाळेतील वातावरण अधिकच आनंदी झाले होते.
या चिमुकल्यांच्या अनोख्या दिंडी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे संस्थापक श्री. के. डी. पाटील यांनी दिंडीचे पूजन केले. यावेळी मुलांनी सुंदर असा रिंगण सोहळा देखील सादर केला, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडी सोहळ्यामुळे शाळेत एक धार्मिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी संस्थापक के.डी.पाटील, प्राचार्य तेजस पाटील, उपप्राचार्य निर्मला केसरकर, मुख्याध्यापिका शकुंतला पाटील, मेघ पाटील, मनीषा पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…