
राधानगरी तालुक्यातील सरवडे येथून गेली 53 वर्षे अखंड सुरू असणारी पायी दिंडी शनिवारी रोजी विठ्ठल व ज्ञानोबा माऊली नामाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने रवाना. दिंडीची सुरुवात ह.भ.प. बाळासाहेब कदम, सागर पाडळकर, विलास मोरे यांच्या शुभहस्ते झाली.
विठ्ठल मंदिर येथून शनिवारी दिंडीला सुरुवात होऊन हरिनामाच्या गजर करत डोईवर तुळशी आणि खांद्यावर भगव्या पताका,हातात टाळ घेऊन वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले, गावातील भाविकांनी मोठ्या उत्साहात या दिंडीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. इस्पुरली, पु.शिरोली, जयसिंगपूर,अलकुड,घोरपडी कमलापूर, कासेगाव, आणि पंढरपूर. येथे विसावा घेऊन पोहचणार आहेत, विसावाच्या ठिकाणी श्रीकृष्ण देशमुख,मधुकर पाटील, उदय शास्त्री,मारुती भोसले, एम पी पाटील चंद्रकांत पाटील, रोहित सावंत, भागवत मानकर, सचिन संकपाळ, अशोक कौवलकर यांची प्रवचन कीर्तन सेवा होणार आहे.
दिंडी चालकह.भ.प. बाजीराव पाटील, व्यासपीठ चालक मारुती वागवेकर, आनंदा पाटील, विजय वाईंगडे, विणा सेवा देणार आहेत तर डॉ.जे. के. पाटील वैद्यकीय सेवा देणारे आहेत, सर्व वारकऱ्यांच्या व दिंडीला भेट देणाऱ्या भाविकांच्या सहकार्याने पुढे जाणार आहे अशी माहिती वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह. भ.प. शिवाजी वागवेकर यांनी यावेळी दिली.
सरवडे प्रतिनिधी : प्रा.अमोल कांबळे


