Home वायरल श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी मलकापूर मध्ये उत्साहात साजरी…

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी मलकापूर मध्ये उत्साहात साजरी…

12 second read
0
0
236

मलकापूर शहरांमध्ये मोठ्या उत्साहात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर मध्ये मंगळवार दिनांक २६ जुलै २०२२ रोजी सकाळी ७.३० वा. मूर्ती अभिषेक व सकाळी ९ वाजता मूर्तीची व पोथीची पालखी दिंडी आणि दुपारी १ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा बक्षीस सत्कार वितरण समारंभ हा 30 जुलै 2022 रोजी करण्यात येणार आहे. दिंडीला वयस्कर, लहान मुले, मुली व महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पूजा ,अभिषेक, मंत्रोच्चार श्री. निर्मलानंद स्वामीजी यांनी केला. यावेळी दिंडी सोहळ्यास खास जिल्हा बँक संचालक व उदय साखरेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड यांची उपस्थिती होती. मलकापूर दिंडी प्रदक्षिणा मार्गामध्ये घरोघरी दिंडीची पूजा, आरती करून स्वागत करण्यात आले.

यावेळी विठ्ठल मंदिर परिसरात रिंगण सोहळा उत्साहात झाला. या कार्यक्रमाची आयोजन हे श्री. संत नामदेव शिंपी समाज व राजाई महिला मंडळ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. यावेळी शिंपी समाज अध्यक्ष- योगेश खटावकर, उपाध्यक्ष -अनिकेत हिरवे, खजानिस- प्रकाश मिरजकर, सेक्रेटरी -अमर खटावकर,पुरुषोत्तम ओतारी, रवींद्र खुर्द, प्रशांत खटावकर, दस्तगीर आत्तार,नगरसेवक – सुभाष कोळेकर, चंद्रकांत पास्ते, मंगेश खटावकर तसेच राजाई महिला मंडळ अध्यक्ष -शोभा हिरवे,उपाध्यक्ष -अनुराधा हिरवे, खजानिस- अरुणा तांदळे, सेक्रेटरी -संजीवनी आनेकर, उप- सेक्रेटरी -गीतांजली कोळेकर, माजी नगराध्यक्ष -शोभा मिरजकर, माजी उपनगराध्यक्ष-अनुराधा हिरवे तसेच सर्व समाज बांधव,भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय उपस्थित होते.

कोल्हापुरी कारभारसाठी मलकापूर प्रतिनिधी- रोहित पास्ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…