Home Uncategorized पृथ्वीराजसिंह यादव यांनी घेतली शिरोळकरांची काळजीस्वखर्चाने टँकरद्वारे केला पाणीपुरवठा

पृथ्वीराजसिंह यादव यांनी घेतली शिरोळकरांची काळजीस्वखर्चाने टँकरद्वारे केला पाणीपुरवठा

2 second read
0
0
164

शिरोळ : प्रतिनिधी

पालिकेच्या दुर्लक्षामुळे शिरोळ शहरातील गेल्या काही दिवसापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कृष्णा नदीत मुबलक पाणी असूनही ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. शिरोळकरांच्या या गंभीर समस्येची दखल घेत येथील युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे शिरोळ शहरातील विविध भागात पाणीपुरवठा करून नागरिकांची काळजी घेतली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे. पाणी योजनेकडे अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. एक दिवस आड मिळणारे पाणी आता आठ आठ दिवस नागरिकांना मिळणे मुश्किल झाले आहे. किमान पिण्यासाठी पाणी मिळावे अशी अपेक्षा नागरिकांच्यातून केली जात आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. नगरपालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. पाण्यासाठी शिरोळकरांची होत असलेली धावाधाव पाहून युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वखर्चाने टँकरद्वारे शहरातील विविध भागात पाणीपुरवठा सुरू केला आहे.

गेल्या चार दिवसापासून त्यांनी अनेक प्रभाग व उपनगरात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय टँकरद्वारे केली. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनीही कौतुक केले असून. पृथ्वीराजसिंह यादव हेच जनतेची काळजी घेणारा युवानेते असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी बोलताना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…