
जयसिंगपूर : प्रतिनिधी
दत्तवाड येथे ७२ गुंठ्यात साकारत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त २० बेडला मान्यता मिळाली असल्याने सर्व सोयी उपलब्ध असणाऱ्या या रुग्णालयात आता ५० बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दत्तवाड परिसरातील नागरीकांना याचा मोठा लाभ होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. ग्रामीण भागातील रुग्णांना शासनाच्या वतीने मोफत अत्याधुनिक सेवा सुविधांचा लाभ मिळावा या हेतूने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दत्तवाड ग्रामीण रुग्णालयासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाची सर्व सोयी सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यातच परिसरातील रुग्णांची संख्या पाहता रुग्णालयात असणाऱ्या अपुऱ्या बेडमुळे भविष्यात रुग्णांची होणारी अडचण लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अतिरिक्त २० बेड मंजूर करून घेतली असल्याने सदरचे रुग्णालय आता ५० बेडचे होणार आहे.
दतवाड ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी १६ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे, जुने रुग्णालय निर्लेखन करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, लवकरच निर्लेखनाचे काम सुरू होणार आहे. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ७२ गुंठे इतक्या जागेमध्ये ३० खाटांचे हे सुसज्ज रुग्णालय उभे राहणार आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक सेवा सुविधा देखील पुरवल्या जाणार आहेत. दत्तवाडसह परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे रुग्णालय नेहमीच आरोग्यमंदीर ठरले आहे. या भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, या हेतूने आमदार यड्रावकर यांनी या ग्रामीण रुग्णालयाला मोठा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर रुग्णालयाचे तात्पुर्ते स्थलांतर ग्रामपंचायतीने उपलब्ध केलेल्या इमारतीत होणार असल्याने त्या ठिकाणी सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदार यड्रावकर यांनी १५ लाख रुपयांच्या खर्चाची तरतूद केल्याने याचेही काम पूर्णत्वास आले आहे. लवकरच या ठिकाणी सदरचे रुग्णालय स्थलांतर होणार आहे. यातच अतिरिक्त २० बेडमुळे सदरचे रुग्णालय हे ५० बेडचे होणार असल्याने रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे.