Home Uncategorized ग्रामीण रुग्णालय नव्हे तर गोरगरिबांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ; आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून १६ कोटी १५ लाखाचा निधीतून दत्तवाड ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या कामाला गती

ग्रामीण रुग्णालय नव्हे तर गोरगरिबांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ; आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून १६ कोटी १५ लाखाचा निधीतून दत्तवाड ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या कामाला गती

8 second read
0
0
24

जयसिंगपूर : कुणाल कांबळे
७२ गुंठ्यांवर अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम, ५० खाटांचे रुग्णालय, स्त्रीरोग व पुरुष वॉर्ड, दोन ऑपरेशन थिएटर, कन्सल्टिंग रूम्स, एक्स-रे, दंत, नेत्र, बालरोग विभाग, सर्व प्रकारच्या सर्जरी सुविधा, असणार गर्भवती महिलांसाठी विशेष व्यवस्था, शवविच्छेदन व एमएलसी सुविधा, महात्मा फुले जनआरोग्य योजना व RBSK योजनांचा लाभ, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार सुविधा, महालॅबच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या तपासणी सुविधा या कुठे खाजगी रुग्णालयात नाही तर दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून १६ कोटी १५ लाखांच्या निधीतून ग्रामीण रुग्णालयाची इमारत साकारत आहे आणि त्यामध्ये या सुविधा देण्यात येणार असल्याने दत्तवाड सह परिसरातील गावातील रुग्णांसाठी हे रुग्णालय एक आरोग्यमंदिर ठरणार आहे.

दत्तवाड परिसरातील नागरिकांच्या आरोग्यसेवेला प्राधान्य देऊन सध्या युद्धपातळीवर उभारत आहे. ग्रामीण भागातही उत्कृष्ट आणि सर्वसमावेशक रुग्णालय उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी १६ कोटी १५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या रुग्णालयाच्या पाया खोदण्याचा शुभारंभ झाला आणि त्यानंतर कामाला मोठा वेग आला आहे.

७२ गुंठ्यांवर उभारत असलेले हे रुग्णालय आधुनिक वैद्यकीय सुविधांनी परिपूर्ण असेल. ५० खाटांची क्षमता, स्वतंत्र स्त्रीरोग व पुरुष वॉर्ड, दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, विविध तज्ञ डॉक्टरांसाठी कन्सल्टिंग रूम्स, एक्स-रे विभाग, दंत, नेत्र आणि बालरोग विभाग अशा सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध होणार आहेत. विशेषतः सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक उपकरणे, प्रशिक्षित स्टाफ आणि सुरक्षित वातावरण यामुळे हे रुग्णालय खाजगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटललाही मागे टाकेल.

गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, सुरक्षित प्रसूतीसेवा, नवजात बालकांसाठी विशेष देखभाल विभाग उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील महिलांसाठी हा विभाग अत्यंत महत्त्वाचा ठरेल. आतापर्यंत प्रसूतीसाठी शहरात जाण्याची गरज भासत असे; परंतु दत्तवाड रुग्णालय सुरू झाल्यानंतर महिलांना तातडीची उपचारसुविधा गावातच मिळणार आहे. शिवाय या रुग्णालयात शवविच्छेदन आणि एमएलसी (Medico Legal Case) सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना अन्यत्र जाण्याचा त्रास वाचणार आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि RBSK योजनांचा लाभ या रुग्णालयात थेट मिळणार असल्याने गरीब कुटुंबांना मोफत किंवा अतिशय कमी खर्चात उपचार घेता येतील. वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या काळात या सुविधा ग्रामीण जनतेसाठी मोठा दिलासा आहेत.

ग्रामीण आरोग्यसेवेमध्ये पूरक म्हणून आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचार विभागही या रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहे. पारंपरिक उपचारपद्धती आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा यांचा समन्वय ग्रामीण नागरिकांसाठी एक पर्यायी व सर्वांगीण व्यवस्था उपलब्ध करून देणार आहे. महालॅबच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या रक्त, मूत्र आणि अन्य तपासण्या गावातच तत्काळ उपलब्ध होतील. तपासणीसाठी रुग्णांना शहरात जाण्याची आवश्यकता राहणार नाही, त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही मोठ्या प्रमाणात वाचतील.

शिरोळ तालुक्यातील आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी आमदार यड्रावकर यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे. उदगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे सुरू असलेले बांधकाम, शिरोळ ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि आता दत्तवाड १६ कोटी १५ लाखांचा निधीच्या माध्यमातून या रुग्णालयाच्या इमारतीची काम सुरू आहे याचा थेट फायदा दतवाडसह परिसरातील मिळत आहे. पूर्वी अनेक उपचारांसाठी खासगी रुग्णालयांच्या दारात जावे लागे, ज्यामुळे आर्थिक ताण वाढत असे. परंतु आता अत्याधुनिक सुविधा असलेले सरकारी रुग्णालय गावातच उभारत असल्याने गोरगरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोफत व उत्कृष्ट उपचार मिळणार आहेत.

हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर आसपासच्या गावांसाठी हे ग्रामीण रुग्णालय अतुलनीय आरोग्यसेवा देणारे ठिकाण ठरेल. मल्टीस्पेशालिटी उपचार, जलद तपासण्या, प्रशिक्षित डॉक्टर, सरकारी योजनांचा लाभ, सुरक्षित प्रसूतीसेवा आणि सर्व प्रकारच्या सर्जरी सुविधा यामुळे हे रुग्णालय खऱ्या अर्थाने ‘आरोग्यमंदिर’ ठरणार आहे. ग्रामीण भागात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध होत असल्याने दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचा विकास हा शिरोळ तालुक्याच्या आरोग्य विभागातील महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाईल हे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…