
शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे ग्रामपंचायत वतीने वनवनवा जनजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. निसर्ग ठेवा आणि वनसंपदा वाचवण्याच्या दृष्टीने जनजागृती व्हावी या उद्देशाने करवीर चे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेत रमेश कांबळे आणि हातकणंगले चे वनपाल संजय कांबळे यांनी वनाचे महत्त्व आणि वन वनव्याचे होणारे दुष्परिणाम याचे महत्त्व पटवून देऊन मौल्यवान मार्गदर्शन केलं. या सभेला तमदलगेचे वनरक्षक अरुण खामकर हातकणंगले वनरक्षक मंगेश वंजारे निमशिरगावच्या सरपंच अश्विनी गुरव ग्रामसभा सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..



