Home Uncategorized १५ फेब्रुवारी पर्यंत विशाळगड नियम व अटी सह खुला

१५ फेब्रुवारी पर्यंत विशाळगड नियम व अटी सह खुला

3 second read
0
0
105


मलकापूर प्रतिनिधी:
किल्ले विशाळगड १५ फेब्रुवारी पर्यंत पर्यटकांसाठी खुला राहणार आहे. यामध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांना अटी व नियम यासह गड पाहता येणार आहे. यामध्ये एका तासाची वाढ करण्यात आलेली आहे. अशी माहिती शाहूवाडी तालुक्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण व पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी दिली.
गेल्या वर्षी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून घडलेल्या घटनेमुळे या परिसरात संचारबंदी लागून गडावर प्रवेश बंद करण्यात आला होता. हिंसाचार घडल्यानंतर तब्बल १७५ दिवसांनी गड पर्यटन यासाठी खुला करण्यात आला. तसेच ३१ जानेवारी पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटनासाठी गड खुला होता. यानंतर किल्ले विशाळगडावर १५ फेब्रुवारी पर्यंत पर्यटकांसाठी गड खुला राहणार असल्याचा आदेश तहसीलदार यांनी काढला आहे.
यामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे याची माहिती खाली दिली आहे.
१) संघटना किंवा जमावाला धार्मिक किंवा ऐतिहासिक कार्यक्रम परवानगीशिवाय घेता येणार नाही
२) पशुहत्या बंदीमुळे तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे किल्ल्यावर मांसाहारी पदार्थ घेऊन जाणे किंवा शिजवून तयार करण्यावर बंदी आहे
३) कोणालाही गडावर राहता येणार नाही
४) कंबूर्णेवाडी वाडी येथे वाहनांची तपासणी करूनच दर्शनासाठी सोडले जाईल
५) कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी आवश्यक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्य…