व्यापारी व व्यावसिकांनी रस्त्यांवरची अतिक्रमण स्वत:हून काढून न घेतल्यास प्रशासकीय कारवाई करणार, असा इशारा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी आज झालेल्या बैठकीत दिला आहे. शाहूवाडी तहसील कार्यालयात मलकापूर, शाहूवाडी, बांबवडे व सरूड या गावातील वाहतूक कोंडी ची समस्या सोडवण्यासाठी मुख्याधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पदाधिकारी, पोलिस, महसूल, एस.टी.महामंडळाचे अधिकारी, व्यापारी व विक्रेते आदीच्या बैठकित ते बोलत होते. तहसीलदार रामलिंग चव्हाण म्हणाले की, पोलिस प्रशासनाने खासगी वाहने, ट्रव्हल्स, मोठी वाहने यांंना शिस्त लावावी. अन्यथा कारवाई वाढवा यावर पोलिस निरिक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले, ४ स्थानिक स्वराज्य संस्थांनी रिक्षा, एस.टी., दुचाकी, चार चाकी वाहनांच्या पार्किगीची ठिकाणे निश्चत करून, आराखडा तयार करून प्रशासनास सादर करावा व पार्किगसाठी पांढरे पट्टे येत्या २ दिवसात मारून कार्यवाही करावी.
मलकापूर शहरात ज्या व्यापा-यांचे व विक्रीत्यांचे दुकानचे फलक, पाले आदि अतिक्रमणे संबंधीत व्यापा-यांनी आपणहून काढून रस्ता अतिक्रमण मुक्त करावा यासाठी पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधीतांना कारवाईची नोटीस बजवावी. मलकापूर येथील विठ्ठल मंदिरासोबतीचे खाद्य पदार्थ, फुले, फळे यांचे गाडे यांची पालिका प्रशासनाने योग्य ते नियोजन करून मंदिर परिसर मोकळा करावा. बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांची दुचाकी व चारचाकी वाहनांचे नियोजन करावे. कार्यवाही न झाल्यास कोणाची ही गय केली जाणार नाही.
यावर मुख्याधिकारी विद्या कदम यांनी येत्या ५ दिवसात पालिका हद्दीतील विठ्ठल मंदिरपरिसराखाली पांढरे पट्टे मारून संंबंधीतांना हद्दी ठरवून दिल्या जातील. प्रशासनास व्यापा-यांचे पुर्णपणे सहकार्य राहिल. फक्त व्यापाऱ्यांच्या मालांच्या गाड्या उतरून घेण्यासाठी मुबा देण्यात यावी. यावेळी उपस्थित नाथा गांधी, विनायक कुंभार, मंगेश विभुते, महेश कोठावळे, वैभव गांधी, सुभाष कोळेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाने उचत नाका ते पेरिड नाका या भागातील वाहतुक करण्यात कोंडी सोडविण्यासाठी सहकार्य करावे. सायंकाळी ट्रव्हल्सवाल्यांच्या गर्दीमुळे रस्ता जाम होतो, यावर प्रशासनाने उपाययोजना करावी. तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी सांगितले की, त्यांची बैठक बोलवून तोडगा काढू. रस्ताच्या दुतर्फा ५ फुट फुटपाथ शिल्लक राहिलाच पाहीजे. एस.टी महामंडळाने यासाठी सहकार्य करावे. चालक मद्य पिऊन आढळल्यास कारवाई केली जाईल. चालकांना शिस्त लावा. पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने धडक कारवाईची मोहिम सुरु करावी.
यासाठी पोलिस व महसूल प्रशासनांचे सहकार्य राहिल. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास कठोर कारवाई केली.असा इशारा पोलिस निरिक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिला. बैठकीस प्रातांधिकारी निखिल खेमणार, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, माजी सरपंच दिपक जाधव, ग्रामसेवक दत्ता जाधव यांच्या मलकापूर, शाहूवाडी येथील सरपंच,पदाधिकारी, व्यापारी विक्रीत्ये उपस्थित होते.
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते