Home Uncategorized पन्हाळा – शाहूवाडी उपविभागीय गणराया ॲवार्ड २०२५ चे शाहूवाडीतील सिद्धिविनायक मित्र मंडळ मानकरी

पन्हाळा – शाहूवाडी उपविभागीय गणराया ॲवार्ड २०२५ चे शाहूवाडीतील सिद्धिविनायक मित्र मंडळ मानकरी

4 second read
0
0
169

पन्हाळा येथील नरके पब्लिक स्कूल या ठिकाणी शाहूवाडी उपविभागीय गणराया ॲवार्ड वितरण सोहळा कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या वर्षीचा शाहूवाडी उपविभागीय गणराया ॲवार्डचा मानकरी शाहूवाडी तालुक्यातील साळशी येथील सिध्दीविनायक मित्र मंडळ ठरले.द्वितीय क्रमांक पन्हाळा येथील बालाजी तरुण मंडळ तर तृतीय क्रमांक कोडोली येथील श्री नाथ वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. उत्तेजनार्थ म्हणून भैरवनाथ डेव्हलपलर्स तरुण मंडळ कळे, हनुमान तालीम मंडळ अर्जुनवाडा, आवाज तरुण मंडळ शिवारे या मंडळांना गौरवण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाकडून उत्कृष्ट पद्धतीने गणेशोत्सवात सहभाग घेतल्याबद्दल विभागातील 23 मंडळांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस पाटील यांचा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता म्हणाले की गणेश विसर्जन मिरवणूकित सर्व जाती धर्माचे लोक पहायला मिळाले अशाच पद्धतीने समाजामध्ये सामाजिक समतोल राखावा, हा आदर्श छत्रपती शाहू महाराज यांनी घालून दिला आहे तसेच मोहरममध्ये हिंदू लोक पीर पंजाची पूजा करतात तर गणपती उत्सव मुस्लिम लोक साजरा करतात. पुढील वर्षी जिल्ह्यात गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा करावा असं आवाहन गुप्ता यांनी केलं. यावेळी बोलताना शाहूवाडी विभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार म्हणाले की जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली गणराया अवॉर्डची संकल्पना राबविण्यात आली असून चार विभागापैकी शाहूवाडी विभाग हा भौगोलिक दृष्ट्या डोंगर कपारीत वसलेला आहे त्यामुळं हा उपक्रम राबवणे आव्हानात्मक काम होते. परंतु ते मंडळांच्या सहकार्यामुळे पूर्ण झाले असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.यावेळी शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे, राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे, पन्हाळाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय बोबले, कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्ष कैलास कोडग, गगनबावड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…