Home Uncategorized क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडतो : मोहन माने

क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडतो : मोहन माने

4 second read
0
0
81

शिरोळ येथील रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन माने म्हणाले कि, विविध क्रीडा स्पर्धा विद्याथ्यांचा सर्वागिण व व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. बौध्दिक विकासाबरोबर शारिरीक विकास सुदधा महत्वाचा असतो. ब्रिलियंट इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धामधून जिल्हा व राज्य स्तरावर शाळेचा नावलौकिक करीत असतात.

माजी जि. प.सदस्या इंद्रायणी पाटील यांनी, या क्रीडा स्पर्धाच्या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी लंगडी, जिबेली, भोवरा, विटूदांडी, लगोरी, रोपमलखाब इ. पारंपारिक खेळांचे प्रदर्शन दाखवले. ही परंपरा जोपासण्याचे काम ब्रिलियंट स्कूलने केले. शाळेत विविध कौशल्यावर आधारित विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते व उत्तम संस्कार, शिस्त आदीचे शिक्षणही दिले जाते.

संस्थेच्या संचालिका स्वाती माने यांनी, विद्यार्थ्यांनी खिलाडी वृत्तीने खेळावे तसेच हार-जीतकडे सकारात्मक दृष्टीने पहावे, असा सल्ला दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भारती कोळी, माजी नगरसेवक राजेंद्र माने, रोटरी क्लबचे अध्यक्ष बाबुराव जाधव, विनायक माने, गजानन भोसले उपस्थित होते. क्रीडा स्पर्धेसाठी प्राचार्य पी.एस. काकडे, संदिप शहारे, पर्यवेक्षक शेहनाज शेख, ज्योति बरगाले, मेघा ढेकळे व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…