Home Uncategorized शिरटी येथे आमदार राजेंद्र पाटील पाटील-यड्रावकरांच्या फंडातून विविविध विकासकामांचा शुभारंभ

शिरटी येथे आमदार राजेंद्र पाटील पाटील-यड्रावकरांच्या फंडातून विविविध विकासकामांचा शुभारंभ

5 second read
0
0
141

शिरोळ : कुणाल कांबळे

आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या फंडातून शिरटी (ता. शिरोळ) येथे ७० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ शिरटी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तसेच नवीन चर्मकार वस्तीत डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, आमदार यड्रावकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या फंडातून नागरी सुविधा योजनेअंतर्गत कनवाड रस्ता काँक्रीटीकरण करणे, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेंतर्गत चर्मकार समाज नवीन गल्ली रस्ता काँक्रीटीकरण करणे, शिरटी ते घालवाड ग्राम १५ ला मिळणारा रस्ता करणे अशी अनेक गावांतील विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. या सर्व कामांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.

यावेळी सरपंच शुभांगी शिरगावे, ग्रामपंचायत सदस्य विपुल कोगनोळे, अभय गुरव, शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक अण्णासो सुतार, कल्लापा खवाटे, सूर्यकांत उदगावे, रामगोंडा उर्फ बाळू पाटील, राजकुमार कोगनोळे,जितेंद्र कांबळे राजकुमार ढेकळे, रुद्राक्ष कांबळे, शंकर रोजे, राहुल चौगुले, अण्णासो मगदूम, आलम मुलानी, सौरभ पाटील, अभिनंदन सूर्यवंशी, संजय बंडगर, शेलार बंडगर, प्रदीप बने, वृषभ पाटील यासह गावातील नागरिक व यड्रावकरप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच दोन दिवसांपूर्वी पुन्हा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरटी गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीच्या विकासासाठी २० लाख रुपये मंजूर झाल्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…