Home Uncategorized बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे शिरोळ तहसील कार्यालयास निवेदन…

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे शिरोळ तहसील कार्यालयास निवेदन…

4 second read
0
0
26

बदलापूर येथे शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. या निंदनीय घटनेचा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत असून या घटनेतील दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.          

दरम्यान ,शिष्टमंडळाच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयाचे कारकून एस डी मुंजारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी वरिष्ठाकडे त्वरित आपल्या भावना कळवू असे आश्वासन दिले.     

या निवेदनावर कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे, नितीन बागे, जयदीप थोरात, अझर तहसीलदार, इरफान पाटील , विक्रम कांबळे ,रफिक नगारजी , डॉ दगडू माने ,वासिम जमादार, गुरुप्रसाद धनवडे ,अवधूत धनवडे, सचिन कमलाकर यांच्या स्वाक्षरी आहेत.           

निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर येथे एका शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना मानवतेला काळीमा फासणारी व निंदनीय आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापणाने सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक पोलीसांनीही शाळा व्यवस्थापनाला अभय देवून तत्परतेने गुन्हा नोंद न करता पीडीत मुलींच्या पालकांना बारा तास ताटकळत ठेवले आहे.

जनआक्रोश व लोकांच्या तिव्र भावना पाहून नाईलाजाने बारा तासानंतर संबंधित आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे या गंभीर घटनेस जबाबदार असणारे पोलीस प्रशासन, शाळा व्यवस्थापन व संशयित आरोपी यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. पीडित अत्याचार घटनेला पाठीशी घालणऱ्यावर योग्य ती कारवाई व्हावी. अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीस फाशीची शिक्षा देणेत यावी असेही निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपिका परीट यांची बिनविरोध निवड

शिरोळ : प्रतिनिधी चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपिका नितीन परीट यांची बिनविरोध निवड कर…