Home Uncategorized शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना शासनाने तात्काळ मदत द्यावी – जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांची मागणी

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना शासनाने तात्काळ मदत द्यावी – जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांची मागणी

3 second read
0
0
62

शिरोळ तालुका यंदा आलेल्या महापुराने त्रस्त झाला आहे. या महापुराचा फटका पुर क्षेत्रातील अनेक गावांना बसला आहे. शिरोळ तालुक्यात काही दुर्घटना घडल्याने नागरिकांना जीवाला मुकावे लागले आहे. यामुळे शासनाने पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील व शिरोळ तालुका काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमरसिंह कांबळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. अमरसिंह कांबळे यकागल येथील निवासस्थानी मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले.

पूरबाधीत शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करून एकरी एक लाख नुकसान भरपाई दयावी, पूरबाधीत व स्थलांतरीत लोकांना तातडीने सानुग्राह अनुदान देण्यात यावे, ज्या गावांना चारी बाजुने पूराचा वेढा पडतो अशा सर्व गावांना संपूर्ण गाव पूरबाधीत घोषीत करावे, सर्व शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कामगार यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून तातडीने घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दयावा, महापूरामध्ये खराब झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी यासह अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

निवेदनावर नितीन बागे, जयदीप थोरात, अझर तहसीलदार, वसीम जमादार, बबन मोहिते, अविनाश कांबळे, राजू कांबळे, अतुल कांबळे यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…