मलकापूर:
मलकापूर- पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ.एन.डी. महाविद्यालयातील माजी विद्यार्थीनीं कु.मृण्मयी संतोष कुमार पोरे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत( सेट) नुकत्याच उत्तीर्ण झाल्या आहेत.

त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. जे.एस. इंगळे तसेच रसायनशास्त्र विभाग प्रमुख व विज्ञान विभाग प्रमुख प्रो. डॉ. संतोषकुमार पोरे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले . कु.मृण्मयी पोरेयांचे अनेक संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.


