Home राजकारण शेतकरीपुत्राचा बळी देऊ नका, विशाल पाटील यांनी रणशिंग फुंकलं!

शेतकरीपुत्राचा बळी देऊ नका, विशाल पाटील यांनी रणशिंग फुंकलं!

3 second read
0
0
449

दि १६ एप्रिल २०२४

शेतकऱ्याच्या मुलाने खासदार आमदार व्हावे अशी आमची इच्छा आहे. पण शेतकऱ्याच्या मुलाचा बळी देऊ नये, असे म्हणत विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. मी स्वार्थासाठी लढत नाही. ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वसंतदादा आणि राजांराम बापू वाद मिटला, असे म्हणत विशाल पाटील यांनी रणशिंग फुंकलं आहे.सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केला. त्यानंतर ते बोलत होते.

सांगलीतील जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील आणि विशाल पाटील यांचे आजोबा वसंतदादा पाटील यांच्यामध्ये एकेकाळी राजकीय वैर होतं. त्यामुळे त्याचा फटका आता विशाल पाटलांना बसला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या विषयी बोलताना विशाल पाटील म्हणाले, ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वसंतदादा आणि राजांराम बापू वाद मिटला आहे. वसंतदादा आणि काँग्रेस बदल बोलताना विशाल पाटील भावूक झाले.

चंद्रहार पाटील यांना देखील विशाल पाटलांनी उत्तर दिले आहे. विशाल पाटील म्हणाले, शेतकऱ्याच्या मुलाने खासदार आमदार व्हावे अशी आमची इच्छा आहे. पण शेतकऱ्याच्या मुलाचा बळी देऊ नये. हे काँग्रेसचे बंड आहे, आमचे काँग्रेसवर प्रेम कायम रहाणार चिन्ह नेले आमच्याकडून तर वेगळ्या चिन्हावर निवडून येऊ आता माघार घ्यायची नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…