Home राजकारण चंद्रहार पाटील यांनी केला महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल

चंद्रहार पाटील यांनी केला महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल

2 second read
0
0
1,209

१९ एप्रिल २०२४

फक्त सांगलीच नव्हे, तर अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आज (19 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार सुमनताई पाटील आणि काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत उपस्थित होते.

सांगलीमध्ये चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, आज चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संजय राऊत सांगलीमध्ये पोहोचल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून वाद रंगला होता तो वाद आता शांत झाला आहे का? अशी सुद्धा चर्चा रंगली. सांगलीमधील उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष उपस्थित होते.

दरम्यान चंद्रावर पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विश्वजीत कदम उपस्थित राहणार की नाही? याचीच चर्चा सर्वाधिक रंगली होती. मात्र, विश्वजीत कदम यांच्या मातोश्री आजारी असल्याने ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचू शकले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…