Home राजकारण विशाल पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज ; सांगलीमध्ये महाविकास आघाडीला धक्का

विशाल पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज ; सांगलीमध्ये महाविकास आघाडीला धक्का

2 second read
0
0
253

दि १५ एप्रिल २०२४

लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील आणि कार्यकर्ते नाराज झाले. विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

अशामध्ये विशाल पाटील यांनी आज महाविकास आघाडीला धक्का दिला असून यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचसोबत आता विशाल पाटील हे उद्या शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.

सांगलीमध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज घेतले होते. आज विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीला धक्का बसला.

काँग्रेस नेते नागपूरकडे रवाना झाल्यावर विशाल पाटील यांनी निवडणूक कार्यालय गाठत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विशाल पाटील हे उद्या शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या सकाळी ते सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करतील आणि दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दरम्यान, भाजपला सांगली जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. जतमधील भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आणि थेट अपक्ष निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. विलासराव जगताप यांनी संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध केला होता. मात्र भाजपकडून संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे विलासराव जगताप यांनी नाराजी जाहीर करत भाजपला इशारा देखील दिला होता. अशामध्ये आता त्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…