Home राजकारण सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी, आज मोठं शक्तिप्रदर्शन

सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी, आज मोठं शक्तिप्रदर्शन

6 second read
0
0
513

दि १६ एप्रिल २०२४

गेल्या काही दिवसांपासून सांगली मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच झाली होती. मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली . त्यामुळे काँग्रेसचे नाराज असलेले विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर आज ते काँग्रेस पक्षाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे . मात्र यामुळे महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन विशाल पाटील हे रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करत दुसरा अर्ज आज दाखल करणार आहेत.

xr:d:DAF_Fpdiazk:3,j:4632373425486047223,t:24031006

आज सांगलीत काँग्रेस समितीपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार असून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून याच दरम्यान, मोजक्या कार्यकर्त्यांसह विशाल पाटील यांचा काँग्रेसच्यावतीने पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे आमदार सावंत यांनी सांगितले. अखेरपर्यंत आमचे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न राहतील आणि आम्हाला ती मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे . दरम्यान दुसरीकडे या मतदारसंघातून काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे समर्थक देखील प्रचंड आग्रही आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी पत्र लिहले. तसेच रक्ताने लिहलेले पत्र विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या समोर झळकवण्यात आले.आता ते दोन्ही अर्ज दाखल करत आज जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत .

दरम्यान सांगलीच्या या वादात आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उडी घेत विशाल पाटील यांना सल्ला दिला आहे . ते म्हणाले , आता लढाईला सुरुवात झाली आहे. आता मागे जाणे शक्य नाही. त्यामुळे आता मागेपुढे न बघता युतीधर्म पाळून हातात हात घालून काम करा, असा सल्ला त्यांनी विशाल पाटील समर्थकांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…