Home Uncategorized सुळंबी ता.राधानगरी येथे महिला स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा..

सुळंबी ता.राधानगरी येथे महिला स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा..

2 second read
0
0
97

सुळंबी येथील रामलिंग मंदिरामध्ये गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.सुरेखा प्रदीप गुरव यांच्या विशेष प्रयत्नातून महिला साक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत हळदी कुंकू व महिलांना विविध भेटवस्तूंचे वाटप.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून राधानगरी,भुदरगड,आजरा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रकाशरावजी आबिटकर यांच्या पत्नी सौ. विजयालक्ष्मी प्रकाशरावजी आबिटकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुळंबी गावच्या आदर्श शिक्षिका सौ. राजश्री बरगे मॅडम यांनी भुषीवले.

सुळंबी गावच्या लोकनियुक्त व कार्यतत्पर सरपंच सौ. सुरेखा प्रदीप गुरव यांनी आपल्या मनोगतात कुटुंबातील प्रत्येक घरात मुलगी असली पाहिजे तरच त्या कुटुंबाला घरपण येऊ शकते. ‘आम्ही बायां गं’ ही कविता गायन करून स्त्री ची भूमिका विविध क्षेत्रात किती महत्वाची आहे हे सांगितले. प्रमुख पाहुण्या सौ. विजयालक्ष्मी आबिटकर आपले मनोगत व्यक्त करताना स्त्री ही संस्काराची खान असून संस्कृतीचे बीजारोपण करण्याचे अनमोल कार्य तिच्या हातून घडल्याचे उदगार काढले.

अध्यक्षीय भाषणात सौ. राजश्री संजय बरगे यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या मासिक धर्माविषयी समाजातील समज आणि गैरसमज या विषयी मार्गदर्शन केले.तर गावातील वयस्कर महिलांनी उखाणे, व गाणी गायली.या महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या व लोकनियुक्त सरपंच सौ.सुरेखा प्रदीप गुरव यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सरिता चिल्ले, विजयमाला चव्हाण, उपसरपंच उज्वला मोरे, वैशाली पाटील पूनम पाटील, पूजा जाधव ,सुलाबाई पाटील,वनिता बरगे व अनिता पाटील, शिरमाताई हातकर लाभल्या, या कार्यक्रमास प्रदीप गुरव,विजय मोरे, प्रवीण पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन प्रा. आर.एस.पाटील सर यांनी केले तर आभार पुनम अशोक पाटील यांनी केले.

सरवडे प्रतिनिधी :प्रा.अमोल ल. कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…