Home Uncategorized सरवडे येथे पार पडला महिला मेळावा व आरोग्य शिबीर

सरवडे येथे पार पडला महिला मेळावा व आरोग्य शिबीर

3 second read
0
0
277

सरवडे, ता. राधानगरी येथे ग्रामपंचायत तर्फे महिला मेळावा व आरोग्य शिबीर सरवडे गावचे लोकनियुक्त सरपंच रणधीर विजयसिंह मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
महिलांनी आजच्या धावपळीच्या युगात आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे,प्रत्येक नात्यात प्रेम आपुलकी, विश्वास वाढवून कुटूंबातील सवांद वाढवला पाहिजे, महिलांनी स्वयंप्रकाशीत होऊन आपले कुटंब, समाज,गावं यांच्या प्रगतीत हातभार लावला पाहिजे असे मत या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. आनंदा द्वारका दिनकर शिंदे यांनी केले.
तसेच या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले गोकुळ दूध संघांचे प्रशिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री.एम.पी.पाटील सर यांनी दूध व्यवसाय हा कसा शाश्वत असून यावर आपली व आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी सुधारू शकते, दूध वाढ, जनावरांचे व्यवस्थापन, संघाकडून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजना यांची माहिती करून दिली,
या कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला बचत गटांना शाल,शिल्ड, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, महिलांचा रक्तगट, हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर,इ आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यावेळी हळदी कुंकू कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांना ग्रामपंचायत सरवडे यांच्या मार्फत भेट वस्तू देण्यात आल्या,महिलांचा उल्लेख नीय सहभाग पाहून सरवडेचे सरपंच रणधीर मोरे यांनी येथून पुढे ही महिलांच्या आरोग्य, व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध कार्यक्रम ग्रामपंचायत मार्फत राबवले जातील असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमांस गोकुळ संघांचे व बिद्री साखर कारखान्याचे संचालक श्री. आर. के. मोरे (बापू) साहेब, ग्रामपंचायत अधिकारी संभाजीराव पाटील साहेब, संयोगिता रणधीर मोरे, उपसरपंच भुजंगा रानमाळे, शंकर कोपार्डेकर, रानमाळे अंबुबाई पांडुरंग, गुरव वैजयंती विलास, वाईंगडे प्रियांका संतोष, पाटील अर्चना,सुवर्णा कांबळे,इ. ग्रामपंचायत सदस्या, व गावातील असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला होता, या कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्रा.अतुल कुंभार सर तर आभार माजी उपसरपंच छाया यशवंत पाटील यांनी मांडले.
के.के.न्यूज साठी, सरवडे हून :अमोल कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…