Home Uncategorized सरवडे ता. राधानगरी जि. प.मतदार संघात विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम…

सरवडे ता. राधानगरी जि. प.मतदार संघात विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम…

2 second read
0
0
260

सरवडे, तालुका राधानगरी जि.प.मतदार संघात कार्यसम्राट प्रकाशरावजी आबिटकर साहेब यांच्या विकास निधीतून सरवडे येथील गणेश मंदिर ते मालवे फाटा रस्ता, विठ्ठलाई मंदिरासाठी सामाजिक सभागृह, व सुशोभीकरण, गावांतर्गत रस्ते, नवीन बालवाडी, कन्या विद्या मंदिर खोली बांधणी.इ. विविध विकासकामासाठी सुमारे 3 कोटी 31 लाख रुपये एवढा भरीव निधी मंजूर करण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभ विठ्ठलरावजी खराटे मा. व्हाईस चेअरमन बिद्री साखर कारखाना, सरवडे गावचे नूतन सरपंच श्री.रणधीर विजयसिंह मोरे, सरवडे गावच्या उपसरपंच सौ.छाया पाटील व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी श्रीफळ वाढवून केले. त्याचप्रमाणे सरवडे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची नियोजित जागा पाहणी ही करण्यात आली.

या शुभारंभ प्रसंगी बोलताना कार्यसम्राट आमदार प्रकाशरावजी आबीटकर यांनी लोकांच्या मूलभूत गरजा ओळखून आपण या विकासकाम साठी भरीव निधी मंजूर केला आहे, या मतदारसंघाचा विकास करण्यास मी नेहमी अग्रेसर असेन असे मत ही यावेळी त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे सरवडे गावचे युवा लोकनियुक्त सरपंच मा.रणधीर विजयसिंह मोरे साहेबांनी गावच्या विकासाच्या दृष्टीने आपण नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आसून सर्व स्तरातून निधी उपलब्ध करून गावचा चेहरा मोहरा बदलून जिल्ह्यात एक आदर्श गाव म्हणून सरवडे ओळखले जाईल व सरवडे गावासाठी जितका निधी गोळा करून आणता येईल तेवढा आणून गावाचा विकास करण्यास आपण नेहमी कट्टी बद्ध असू असे मत व्यक्त केले.

यावेळी मानसिंग पाटील,राजेश मोरे,यशवंत जाधव,दामोदर वागवेकर,छ. शिवाजी महाराज पुतळा नियोजन कमिटीचे सदस्य पांडुरंग खोत, वाय. के.वाईंगडे, संदीप गोजारे, संदीप पाटील, विजय जरग, महादेव पाटील, शहाजी पाटील, अमोल कांबळे इत्यादी सदस्य हजर होते. या कार्यक्रमाचे आभार तुकाराम कुंभार सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…