Home Uncategorized राशिवडे बू. येथील कन्या विद्या मंदिर मध्ये शालेय साहित्य वाटप सोहळा.

राशिवडे बू. येथील कन्या विद्या मंदिर मध्ये शालेय साहित्य वाटप सोहळा.

4 second read
0
0
698

राशिवडे प्रतिनिधी- कृष्णा लाड.

राधानगरी तालुक्यातील 45 शाळेमधील 2200 विद्यार्थ्यांना ईफिनिटी एक्स आणि उर्मी फौंडेशन पुणे यांच्या सहकार्यातून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कन्या विद्या मंदिर राशिवडे बुद्रुक या शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांनीना स्कूल बॅग, स्वेटर,खडूपेटी, कंपास, रंगपेटी, चित्रकला वही अशा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्ष स्थानी सरपंच संजीवनी पाटील तर उर्मी फाउंडेशनचे दिलीप तिडके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला बापू तोंदकर यांनी आपल्या मनोगतात सदरचे साहित्यचा शैक्षणिक प्रगतीसाठी होणारा उपयोग सांगितला आणि या कार्यक्रमास इन्फिनिटी एक्सचे मॅनेजर आकाश सोकासने यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे नमूद केले. सरपंच संजीवनी पाटील यांनी इफीनिटी एक्स व उर्मी फाउंडेशन यांच्या साहित्य सहकार्याबद्दल आभार मानून भविष्यात आपल्याकडून अशा प्रकारची मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जाधव यांनी केले सूत्रसंचालन आनिल सुतार यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच अजिंक्य गोनुगडे, सदस्य आनंदा चौगुले, मंदाकिनी पाटील, साधना पाटील, स्वप्नाली पाटील, गीता चौगुले हे मान्यवर उपस्थित होते. हा साहित्य वाटप सोहळा यशस्वीरिता संपन्न करण्यासाठी शाळा समितीचे अध्यक्ष तौसीफ आत्तार यांच्याबरोबर सर्व सदस्यांनी प्रयत्न केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…