Home Uncategorized राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे पुन्हा एकदा सुरू होणार जनावरांचा बाजार

राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे पुन्हा एकदा सुरू होणार जनावरांचा बाजार

4 second read
0
0
612

प्रतिनिधी:- कृष्णा लाड

राधानगरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राशिवडे बुद्रुक येथील विविध कारणांनी अनेक वर्षांपासून बंद पडलेला जनावरांचा बाजार पुन्हा एकदा सुरू होत असल्यामुळे पंचक्रोशी मध्ये उत्साहाचे वातावरण दिसते. ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव गोंगाने यांच्या विशेष प्रयत्नातून सरपंच संजीवनी पाटील उपसरपंच अजिंक्य गोणुगडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्यातून हा बाजार पुन्हा एकदा सुरू होत आहे. मुरगुड आणि कोपरडे या मोठ्या बाजारांप्रमाणेच राशिवडे येथील जनावरांच्य बाजारामुळे आसपासच्या तीसहून अधिक गावांमधील व्यापारी आणि खरेदीदार शेतकऱ्यांना हा बाजार सोयीचा होणार आहे. विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना विविध सुविधा पुरविण्याबरोबरच जनावरांना सावली, मुबलक पाणी आणि वैरणीची सोयही करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक 27 10 2023 रोजी नामानंद महाराज चौक गोठण या ठिकाणी हा बाजार भरणार आहे. तरी जनावरांच्या बाजारासंबंधी सर्व लोकांनी व जनावरांच्या साठीचे सर्व प्रकारचे साहित्य विक्री करणारे व्यापारी, शेतकरी यांनी याची नोंद घेऊन बाजारासाठी हजर राहावे असे आवाहन राशिवडे ग्रामपंचायतीने पत्रकाद्वारे केले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…