Home Uncategorized अवनि संस्थेचा जागर प्रकल्पाच्या माध्यमातून चिंचवडे गावामध्ये प्रथमच झाला महिला दिन साजरा…

अवनि संस्थेचा जागर प्रकल्पाच्या माध्यमातून चिंचवडे गावामध्ये प्रथमच झाला महिला दिन साजरा…

2 second read
0
0
77

अवनि संस्था गेली ३० वर्षापासून मुलांच्या आधिकारांवर कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. मार्च २०२१ पासून महानायक आमिताभ बच्चनजी यांच्या निधीतून अवनि संस्थेमार्फत बालविवाह विरोधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बालविवाह रोखण्याचा जागर प्रकल्प चालू आहे.

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवडे गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ.तेजस्विनी सरदार तडूलकर यांनी जागर प्रकल्पाने भेटून महिला दिन साजरा करण्याचे नियोजन केले. यावेळी जागर बालविवाह रोखण्याचा हा प्रकल्प व सरपंचसो यांनी गावामधील महिलांना ग्रामदैवत अंबाबाई मंदिरामध्ये एकत्रित करून बालविवाह, बालक व पालक यांच्यातील संभाषण, करीअर मार्गदर्शन इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्याचे नियोजन केले.

कार्यक्रमच्या प्रमुख पाहुण्या व कार्यक्रमाचे मार्गदर्शक “अवनि संस्था अध्यक्षा मा.अनुराधाताई भोसले” होत्या यांनी या कार्यक्रमातून महिलांना त्यांनी बालविवाह, बालक व पालक यांच्यातील संभाषण, करीअर मार्गदर्शन इत्यादी विषयावर मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी महिलांनी व किशोरवयीन मुलींनी चांगलीच उपस्थिती लावली होती. या कार्याक्रमाची प्रस्तावना लोकनियुक्त सरपंच सौ.तेजस्विनी सरदार तडूलकर व आभारप्रदर्शन सरदार तडूलकर यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी उपसरपंच सरदार पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुनिता पाटील, शोभा सुतार, अर्चना पाटील, मंदाकिनी कांबळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष परशुराम पाटील, कृष्णात पाटील ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश गुरव, बाजीराव कांबळे, भीमराव पाटील उपस्थित होते. कार्याक्रमचे सूत्रसंचालन जयश्री कांबळे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प समन्वक अनिकेत कदम, सतिश पाटील, किशोरी कांबळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…