Home Uncategorized जागतिक महिला दिनानिमित्त अभावीप आयोजित सायबर सिक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन व्याख्यानमाला

जागतिक महिला दिनानिमित्त अभावीप आयोजित सायबर सिक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन व्याख्यानमाला

3 second read
0
2
107


मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व न्यू प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी संचलित प्रायव्हेट ज्युनिअर कॉलेज आयोजित महिला दिनानिमित्त सायबर सेक्युरिटी या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख वक्ते म्हणून सायबर पोलीस ठाणे कोल्हापूर येथील पोलिस निरीक्षक श्री सागर माळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, जागतिक महिला दिनाची माहिती विद्यार्थी प्रतिनिधी कु. सृष्टी पाटील यांनी दिली व प्रा. शिल्पा किल्लेदार मंचावर उपस्थित होत्या. त्याच प्रमाणे सायबर सिक्युरिटी बद्दल मार्गदर्शन करताना श्री.माळवे पुढे म्हणाले की, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सायबर सेक्युरिटी व क्राईम याबद्दल पुरेशी माहिती असणे व त्याबद्दल सजग राहणे गरजेचे आहे.

संगणक प्रणाली आणि नेटवर्कचे हार्डवेअर सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक डेटाची चोरी किंवा हानीपासून संरक्षण करते.संगणक सुरक्षा कडून सेवांमध्ये व्यत्यय येण्यापासून किंवा चुकीच्या दिशा निर्देशापासून संरक्षण केले जाते. संगणक प्रणाली, इंटरनेट वायरलेस, नेटवर्क जसे की ब्लूटूथ आणि वाय-फाय यांसह स्मार्ट उपकरणांच्या वाढीमुळे हे क्षेत्र अधिक महत्त्वपूर्ण होत आहे. राजकारण आणि तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टीच्या अवघडपणामुळे संगणक सुरक्षा हे देखील जगातील एक मोठे आव्हान आहे.आज आपण पूर्वीपेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक उपकरणावर अवलंबून आहोत. आजकाल बेकायदेशीर हॅकिंग च्या वाढत्या प्रमाणामुळे तसेच ऑनलाइन फ्रॉड मुळे आपला डेटा लोकांपासून सुरक्षित करण्याची गरज वाढली आहे.

सायबर क्राईम समस्या अख्या जगात आहे. यामुळे वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. तसेच मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या बँका आणि संस्था यांना सुद्धा याचा धोका आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या रोजच्या जीवनात अशा घटना घडल्यानंतर काय उपाय व योजना केल्या पाहिजेत व त्याबद्दल कोणाकडे माहिती दिली पाहिजे याची पुरेपूर माहिती सायबर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री सागर माळवे यांनी दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन अभावीप शाहूनगराच्या नगरसहमंत्री तनवी माळी यांनी मांडले यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत सायबर सेक्युरिटी बद्दल चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…