Home Uncategorized राधानगरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध

राधानगरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध

3 second read
0
0
124

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली (ता. सराटी) येथे आमरण उपोषणास बसलेल्या समाजातील आंदोलकांवरील अमानुष लाठीहल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राधानगरी तहसील कार्यालयाच्या समोर जाहीर निषेध करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शांततेच्या मार्गानि आंदोलने याबरोबरच न्यायालयीन लढाईही सुरू आहे. मात्र, जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणास मराठा बांधव बसले होते. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारने दबावतंत्राचा वापर करीत आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार, मराठा अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून व गोळीबार करून आंदोलन मोडीत काढले. या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. लाठीहल्ला करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे निवेदन राधानगरी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार निकम यांना देण्यात आले.आंदोलनात तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,राहुल कुंभार ,स्मिताली कवडे,राजेश पाटील, उत्तम चव्हाण,प्रशांत सनदी, संदीप चव्हाण,रोहित कानकेकर,अक्षय भोपळे,अक्षय पाटील,उमेद निल्ले,जगदीश पाटील, प्रवीण मनुगडे, विक्रांत पाटील,रणजीत पाटील,महेंद्र पाटील,तुकाराम कांबळे,प्रज्वल पाटील, प्रमोद पाटील,धनाजी पाटील सहभागी झाले होते.कोल्हापुरी कारभारासाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…