Home Uncategorized हेरवाड ते पंढरपूर श्रावण वारी पायी दिंडी प्रस्थान…

हेरवाड ते पंढरपूर श्रावण वारी पायी दिंडी प्रस्थान…

3 second read
0
0
302

गुरुवर्य विवेकानंद वास्कर फड यांच्या सहकार्याने व श्रावण वारी दिंडी सोहळा हेरवाड यांच्या संयोजनाने प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्यात हेरवाड ते श्री क्षेत्र पंढरपूर श्रावण वारी पायी दिंडी दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी मोठया उत्साहात प्रस्थान झाली. गावातील आबालवृद्धांनी उपस्थित राहून पायी दिंडीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन व क्षारपड मुक्तीचे जनक उद्यानपंडित गणपतराव पाटील,दिलीप शिरढोणे यांच्यासह मान्यवरांनी दिंडीस शुभेच्छा दिल्या.

वारी म्हणजे एक अनोखा अनुभव आहे. वारीमध्ये सर्वधर्मसमभावाची शिकवण मिळते. वारीत कोणताही भेदभाव नसतो. मूल्यसंस्काराची बीजे वारीमध्ये रुजविली जातात, असे प्रतिपादन हेरवाडच्या माजी सरपंच चंद्रकला पाटील यांनी केले. पायी दिंडी वारीमुळे हेरवाड गावात धार्मिक व अध्यात्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली असून अनेक युवक व्यसनमुक्त झाले आहेत. याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन दिलीप बाळगोंडा पाटील यांनी केले.

दरम्यान श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे सामूहिक आरती करण्यात येवून दिंडी मार्गस्थ झाली. दिंडी सोहळ्याचे संयोजन श्री.दिलीप बाळगोंडा पाटील (मफत), बाळासो परीट व रमेश माने यांच्यासह वारकरी,भाविक सहभागी झाले आहेत. यामध्ये माहिलांची संख्या लक्षणीय होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…