Home Uncategorized शालेय फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत जिजाऊ पाटील हिला रौप्यपदक

शालेय फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत जिजाऊ पाटील हिला रौप्यपदक

1 second read
0
4
135

कोल्हापूर :२१ छत्तीसगड (जग्दलपूर) येथे सुरू असलेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत वैयक्तिक फॅाईल प्रकारात कुमारी जिजाऊ जीवन पाटील(वय ११ वर्षे) रा आसगाव ता. पन्हाळा हिने रौप्यपदक पटकवले तर टीम फॅाईल मध्ये कांस्य पदक मिळविले आहे.जिजाऊ पाटील(वयं ११) हिने १४ वर्षाखालील गटात हे पदक मिळवले आहे.

सेमी फायनल लढत हरयाणाची अनुष्का सोबत झाली त्यात ती १०:६ ने जिंकली.तर फायनल हरियाणाच्या हिरल वर्मा सोबत झालेल्या लढतीत हिरल १०:७ ने जिंकली.या स्पर्धेत एकूण २२ राज्यातील खेळाडू सहभाग घेतला होता.

आता पर्यंत ४ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन ३ पदकांना गवसणी घातली आहे.तसेच थांयलॅड येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे.

फेन्सिंग खेळ प्रकारात सर्वात्तम कामगिरी करत महाराष्ट्राचे शिरपेचात मानाचा तुला रोवला.
जिजाऊ पाटील ही अक्षरनंदन पुणे या मराठी शाळेची विद्यार्थ्यांनी असून एन गार्ड फेन्सिंग ॲकॅडमी बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्याचा खेळातील सर्वाच्च शिवछत्रपती पुरस्कार विजेती आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू श्वेता चंडालीया,मणिपूरचे बोमाय,तामिळनाडूचे शंकरा यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करते.तिला भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले आहे. जिजाऊ पाटील ही माजी जिल्हा परिषद सदस्य पी डी पाटील(आसगावकर ) यांची नात असून पाटील कुटुंबीयांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…