Home Uncategorized कुमारी जिजाऊ पाटील हिचे तलवारबाजी मध्ये नेत्रदीपक कामगिरी…

कुमारी जिजाऊ पाटील हिचे तलवारबाजी मध्ये नेत्रदीपक कामगिरी…

4 second read
0
0
82

राजमुंद्री (आंध्रप्रदेश) येथे २५ ते २८ मार्च दरम्यान झालेल्या २५ व्या सब- ज्युनिअर राष्ट्रीय फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत कु. जिजाऊ जीवन पाटील ( मु पो. आसगांव) वैयक्तिक फॅाईल प्रकारात सुवर्ण पदक आणि टीम फॅाईल मध्ये ब्रॅाझ पदकाचा मान मिळविला.

जिजाऊ पाटील(वयं ११)असून तिने १४ वर्षाखालील गटात हे पदक मिळवले आहे.जिजाऊ पाटील ने उपांत्यपूर्व लढतीत बिहारची राज केसरला १५:६ असे हरविले आणि अंतिम सामन्यांत चंदीगढ च्या चामोली रूबीला १५:९ ने जिंकून महाराष्ट्राचे नाव सुवर्ण पदावर कोरले.

जानेवारी मध्ये झालेल्या शालेय क्रिडा स्पर्धेत ही रौप्य पदक जिंकले होते…आता पर्यंत ४ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन ६ राष्ट्रीय पदकांना गवसणी घातली आहे. तसेच २०२२ रोजी थांयलॅड येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे.फेन्सिंग खेळ प्रकारात सर्वात्तम कामगिरी करत महाराष्ट्राचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

कुमारी जिजाऊ पाटील ही आसगाव (ता.पन्हाळा) या गावाची असून अक्षरनंदन पुणे या मराठी शाळेची विद्यार्थ्यांनी आहे.एन गार्ड फेन्सिंग ॲकॅडमी बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्याचा खेळातील सर्वाच्च शिवछत्रपती पुरस्कार विजेती आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू श्वेता चंडालीया,मणिपूरचे बोमाय, तामिळनाडूचे शंकरा यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करते.

तिला भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले आहे. या यशा मध्ये तिला तिचे आजोबा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पी डी पाटील (आसगावकर), वडील जीवन पाटील, आई मनीषा पाटील तसेच पाटील कुटुंबीयांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…