Home Uncategorized राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कडून सत्कार समारंभ

राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कडून सत्कार समारंभ

2 second read
0
1
2,878

कोल्हापुरातील पाचगाव येथील रायगड कॉलनीतील सामान्य कुटुंबातील व्यक्ती मा.रवींद्र घाटगे हे खरे मंगल कार्यालय या ठिकाणी वॉचमन (सिक्युरिटी गार्ड) म्हणून काम करतात, ते सकाळी 7 वाजता कामाला जातात. आपण समाजाचे काही तरी देणे लागते या उद्देशाने त्यांनी कामाला जाण्याअगोदर सकाळी 6 वाजता रक्तदान करून आपल्या कामाला त्यांनी सुरवात केली, तसेच पाचगाव मधील गृहिणी भारती सावंत यांनी आपले घर सांभाळत गरीब परिस्थितीतून एक पाचगाव मिसळ हे छोटेसे हॉटेल चालू केले. त्यामुळे या दोघांचा आज राजे फाउंडेशन तर्फे राजे फाउंडेशन ची प्रतिमा आणि गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी राजे फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. शुभम शिरहट्टी, पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.रशीद सय्यद, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख संजीव भालेकर, कोल्हापूर जिल्हा सचिव मंजूर सय्यद, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ.शितल चौगुले, करवीर तालुका सचिव नंदकुमार पोवार, कोल्हापूर शहर महिला उपाध्यक्षा सौ.उमा पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…