मलकापूर प्रतिनिधी
तालुका शाहूवाडी येथील शित्तुर वारून पैकी तळीचा वाडा येथे घराशेजारी जनावरे चरण्यासाठी गेलेल्या सारिका, तिच्यावर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले.या वर्षातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, ही घटना आज सकाळी दिनांक २०/११/२०२३ रोजी घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सारिका बबन गावडे वय वर्ष ९ व तिची आई गंगाबाई गावडे तिच्यासोबत घराच्या शेजारी जनावरे चरण्यासाठी घेऊन गेली असता, यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सारिका हिच्यावर हल्ला केला यावेळी एका मुलाने व तिच्या आईने सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बिबट्याने तिच्या नरडीचा घोट घेतल्याने ती जागीच मृत्यू पावली. तिच्या अंगावर बिबट्याच्या हल्ल्याच्या तीव्र जखमा व गळ्यावर व्रण दिसून येत होते. घटनास्थळी नातेवाईकांची गर्दी व परिसरातील गावकरी घटनास्थळावर मोठ्या संख्येने उपस्थित झाले.
यावेळी शाहूवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी ग्रामस्थांनी अधिकारी यांना प्रश्नांचा भडिमार केला.संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे.
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते