Home वायरल कोल्हापुरात केबलच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

कोल्हापुरात केबलच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

2 second read
0
0
2,907

कोल्हापूर मध्ये केबल वादातून एकावर प्राण घातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे, या घटनेत एका केबल कंपनीचे ऑपरेटर सुहास शांताराम भागम हे जखमी झाले. मात्र या घटनेमुळे कोल्हापुरात पुन्हा एकदा केबलवर उफाळून आल्याचा दिसून येतंय. माझ्या ग्राहकांना माझ्याबद्दल काय काय सांगतोस असं विचारीत संजय मधुकर गायकवाड या एका केबल कंपनीच्या ऑपरेटरने दुसऱ्या एका केबल कंपनीच्या सुहास बागम यांच्यावर खंजीर सारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सुहास भागम यांच्या डाव्या हातावर खोल जखम झाली आहे. जरग नगर येथील रहिवासी सुहास भागमी हे गायकवाड यांच्याकडे गेल्या पाच वर्षांपासून एका केबल कंपनीसाठी केबल ऑपरेटर म्हणून काम करतात. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुहास बागल हे उद्यमनगर परिसरात केबल ऑपरेटिंग चे काम संपवून आपल्या चार चाकीतून डी वाय पाटील हॉस्पिटल इथं नातेवाईकांना पाहण्यासाठी जात होते. यावेळी परस्परविरोधी एका केबल कंपनीचा केबल ऑपरेटर संजय गायकवाड यांनी भागम यांना अडवले आणि चार चाकी दोन बाहेर येण्यास सांगितलं यावेळी माझ्या ग्राहकांना माझ्याबद्दल काय काय सांगतोस असं म्हणत अचानक भागम यांच्यावर हल्ला केला. पोटावर होणार असलेला हल्ला भागम यांनी प्रथम चुकवला यानंतर गायकवाड याने त्यांच्या डाव्या हातावर खंजीर खुपसला आणि घटनास्थळावरून पसार झाला बागम यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केलं दरम्यान या घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या घटनेची राजारामपुरी पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…