Home Uncategorized अवैद्य व्यावसाईकांच्यावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी -भारतीय दलित महासंघ

अवैद्य व्यावसाईकांच्यावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी -भारतीय दलित महासंघ

2 second read
0
0
357

मलकापूर प्रतिनिधी

बांबवडे ता. शाहूवाडी या ठिकाणी बेकायदेशीररीत्या मटकाव्यवसाय, गांज्या विक्री, जुगार व लॉजिंगवर वेशा व्यवसाय चालू असुन, अल्पवयीन मुले, विद्यार्थी झटपट पैसा मिळण्याच्या हव्यासापायी अवैद्य व्यवसायाकडे ओढला जावू लागला आहे. परिणामी गुन्हेगारीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असुन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्मान झाला आहे. पोलिस प्रशासन सदरच्या गंभीर प्रश्नाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैद्य व्यवसाईक माजले असुन त्यांना पोलिस प्रशासनाचे भय राहीलेले नाही.

पोलिस प्रशासनाने सदरच्या निवेदनाची संवेदनशीलरीत्या गांभीर्याने दखल घेवून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या अवैद्य व्यवसाईकांच्यावर तात्काळ मोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी. अन्यथा बांबवडे पोलिस स्टेशनच्या समोर पोलिस प्रशासनाच्या बेजबाबदार कार्यपध्दतीचा आंदोलनाद्वारे जाहीर निषेध केला जाईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे निवेदन शाहूवाडी पोलिस ठाणे यांना देण्यात आले यावेळी उपस्थित नाना लोखंडे, रोहित यंटम, आकाश कांबळे, सिध्दार्थ बनसोडे, अभिषक गोसावी, दयानंद कांबळे, संजय बनसोडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…