मलकापूर प्रतिनिधी
उकोली ता. शाहूवाडी या ठिकाणी सुतार गल्लीतील विजखांबाची अत्यंत दुरावस्था झाली. कोणत्याही क्षणी तो ढासळून जिवीत हानी होवू शकते. सबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना सुतार वस्तीतील नागरिकांनी वारंवार निवेदन देवून, तोंडी सूचना करूनही बेजबाबदार संबंधीत प्रशासनाने मानवी जिवीताशी निगडीत असणा-या या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. अतिशय जिर्ण झालेल्या विद्युत खांबामुळे सुतार वस्तीतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विजबिल वसुलीसाठी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणा-या संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांची नागरिकांच्या सेवेसाठी तितकीच तत्परता दिसत नाही.
सदरच्या निवेदनाची व नागरिकांच्या जीवीताशी निगडीत असणा-या प्रश्नाची संबंधीत विद्युत कंपनी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून उकोली, सुतारगल्ली वस्तीतील जिर्ण झालेला विद्युतखांब तात्काळ बदलावा, अन्यथा बेजबाबदार विद्युत वितरण कंपनीच्या अधिका-यांच्या व कर्मचारी यांचे उदासिन धोरणाविरोधात शाहूवाडी विद्युत कार्यालयासमोर दि.१७/०५/२०२३ रोजी बोंबाबोंब आंदोलन केले जाईल व निर्माण होणारे कायदा व सुव्यवस्थेच्या गंभीर प्रश्नाला संबंधीत प्रशासन जबाबदार राहिल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे निवेदन भारतीय दलित महासंघ शाहुवाडी तालुका अध्यक्ष – आकाश कांबळे (ओकोलीकर), विजय मोरे, वसंत पाटील, प्रकाश कांबळे, सिध्दार्थ बनसोडे, सुनिल पाटील, विशाल कांबळे, दयानंद कांबळे हे उपस्थीत होते.
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते