मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर ता. शाहुवाडी येथील संशयित आरोपी अनिल गणपती भोपळे ( वय ५२ ) याने मतीमंद मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी त्यास पोलीसांनी अटक करून त्याचेवर कडक कारवाई करावी. माणुसकीला काळीमा फासणारी आणि एका असाय गरीब मतिमंद युतीचा गैरफायदा घेत अ मानवी अत्याचार केलेल्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणी साठी मलकापूर शहरात संपूर्ण दिवस बंद पाळण्यात आला.शहरवसिय व पंचक्रोशीतील नागकांनी यावेळी शहरातुन मुकमोर्चा काढण्यात आला. या निषेध फेरीत संपूर्ण शहरातील महिला, नागरिक, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चात महिलाची संख्या लक्षणीय होती. तर संपूर्ण शहर पूर्णतः बंद ठेवण्यात आले.
ओळखीचा गैर फायदा घेऊन संशयित आरोपी अनिल भोपळे मंतिमंद मुलीवर अत्याचार केला. पोलीसांनी संशयित आरोपीला तातडीने अटक करावी. शनिवारी, रविवार २ दिवस मलकापूरात तणावाचे वातावरण होते. रविवारी सकाळी छ. शिवाजी महाराज चौकात नागरीक, महिला जमून शहरातून मुकरॅली काढण्यात आली. अनिल भोपळे याला अटक करा या मागणीचे निवेदन शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना दिले.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे म्हणाले, या तपासात कोणती कोणतीही हयगय केली जाणार नाही. पिढीतेला न्याय देण्यासाठी हा तपास निपक्षपतिपाणी केला जाणार आहे आरोपीला अटक करून त्याच्यावर कारवाई होणार, कोणत्याही दबावाला पोलीस प्रशासन बळी पडणार नाही असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. पिडित मुलीची परिस्थिती गरीबीची आहे. पिडित मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या रॅलीत मलकापूर शहरवासीय , पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.