Home Uncategorized युवा फ्रेंड्स तर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा

युवा फ्रेंड्स तर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा

2 second read
0
0
147

मलकापूर प्रतिनिधी

घुंगूर तालुका शाहूवाडी येथे युवा फ्रेंडस च्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या निमीत्ताने सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, माजी सरपंच बाजीराव सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले.

या स्पर्धेत विठ्ठल रुक्मिणी गट घुंगूरवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला, हिरकणी ग्रुपने दुसरा क्रमांक, राधाकृष्ण आणि वक्रतुंड ग्रुप मध्ये तिसरा क्रमांक विभागून दिला.या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थितीत संजय खोत ग्रामपंचायत सदस्य घुंगूर, सरपंच शुभांगी कांबळे, सदस्य पुजा पाटील, सदस्य सुनील कांबळे, सरदार कांबळे, सर्जेराव कांबळे, सह मंडळाचे कार्यकर्ते बाजीराव पाटील, ओमकार पाटील, सह कार्यकर्ते उपस्थित होते. पंच म्हणुन रवींद्र चौगुले करंजफेनकर यानी काम पाहीले.

ग्रामपंचायत सदस्य संजय खोत यांनी विठ्ठल रुक्मिणी गटाने प्रथम क्रमांक पटकवले बद्दल सर्व महिलांचा फेटा बांधून सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

प्रतिनिधी : रोहित पास्ते मलकापूर येथील सुभाष रोड परिसरातील रहिवासी श्री. आनंदराव बंडू पाटी…