Home Uncategorized १६ वर्षे युवतीचा पाय घसरल्याने विहिरीत बुडून मृत्यू

१६ वर्षे युवतीचा पाय घसरल्याने विहिरीत बुडून मृत्यू

2 second read
0
0
526

मलकापूर प्रतिनिधी

पुसारळे पैकी धनगर वाडा ता. शाहूवाडी येथील युतीचा विहिरीला धुणे धुण्यासाठी गेले असता, पाय घसरून मृत्यू झाल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार कुमारी नथाबाई बाबू कोळापटे ही १३/०९/२०२३ रोजी सकाळी ९ च्या सुमारास कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेली होती.

यावेळी नथाबाई हिचा पाय घसरून ती विहिरीत पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रुग्णालयात करून तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.तिच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

. जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…