Home Uncategorized पालेश्वर धरणार पोहताना पाण्यात बुडून मृत्यू

पालेश्वर धरणार पोहताना पाण्यात बुडून मृत्यू

3 second read
0
0
128

मलकापूर:

कोल्हापूर मधून पर्यटनासाठी सध्या खूप नागरिक पालेश्वर या ठिकाणी येत आहेत. माण पैकी ठाणेवाडी ता. शाहूवाडी येथील पालेश्वर धरणावरील धबधब्यावर पोहण्यासाठी आलेल्या प्रकाश रामचंद्र मोहिते (वय ५८ मुळ रा.कराड जि.सातारा) सध्याचा पत्ता रा.शिवाजी पार्क कोल्हापूर या ठिकाणी. प्रकाश मोहिते हे धबधब्याच्या पाण्यात पोहत असताना पाण्यात बुडून त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी १२.३० वा. घडली. याची नोंद शाहूवाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.
शाहूवाडी पोलिसातून मिळालेली माहिती, मयत प्रकाश मोहिते हे आयकर विभागात कार्यरत आहेत.

आज सकाळी त्यांचे मेहुणे उदयसिंह वसंतराव जाधव खासगी सिक्युरिटी (रा. मांगूर ता. चिकोडी जि. बेळगाव) सध्याचा पत्ता, राजारामपूरी कोल्हापूर. ही कुटुंबे पर्यटनासाठी पालेश्वर धरणावरील धबधबा या ठिकाणी आले होते. या वेळी प्रकाश मोहिते हे, पालेश्वर धरणावरील धबधब्याच्या पाण्यात पोहत असताना बुडाले. कुटूंबियांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले तेव्हा ते बेशुद्ध आवस्थेत होते. त्यांना उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रूग्णालयात आणले परंतु उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे संबंधीत वैद्यकीय अधिकाऱ्यांने सांगितले. अचानपणे घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी होती.रुग्णालयात शैवविच्छेदन करून पुढील विधीसाठी त्यांचा मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलिस नाईक एस बी स्वामी हे करिता आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…