Home Kolhapur गोकुळ शिरगांव (गोशिमा कार्यालय) येथील ईएसआयएसच्या सेवा दवाखान्याची सुरूवात

गोकुळ शिरगांव (गोशिमा कार्यालय) येथील ईएसआयएसच्या सेवा दवाखान्याची सुरूवात

3 second read
0
2
2,065

कोल्हापूर: गोशिमा व ईएसआयएस, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या गोकुळ शिरगांव (गोशिमा कार्यालय) येथील ईएसआयएसच्या सेवा दवाखान्याचा कार्यान्वित सोहळा पार पडला. बुधवार (दि ३० ऑगस्ट) ईएसआयएस विमा धारक प्रविण साटम यांचे शुभ हस्ते व गोशिमा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत फीत कापून संपन्न झाला. या सेवा दवाखान्याचा गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना मोठ्या प्रमाणावर लाभ घेता येणार आहे, हा सेवा दवाखाना सकाळी ८.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत कामगारांसाठी खुला राहणार आहे.

मा. खासदार संजय मंडलिक व विज्ञानंद मुंढे यांचे अथक परिश्रमातून गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीसाठी पाच डाॅक्टरांचा सेवा दवाखाना मंजूर झाला. सेवा दवाखान्याचा लोकार्पण सोहळ्याचा भव्य-दिव्य असा कार्यक्रम मा.खासदार संजय मंडलिक तसेच विज्ञानंद मुंढे व गोशिमा पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ आणि गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक यांचे उपस्थित लवकरच करण्यात येणार आहे.

यावेळी गोशिमा चे अध्यक्ष दिपक चोरगे, उपाध्यक्ष स्वरूप कदम, मानद सचिव नितीनचंद्र दळवाई, खजिनदार रणजीत पाटील, संचालक मोहन पंडितराव, जे.आर.मोटवाणी, निमंत्रित संचालक सर्वश्री नचिकेत कुंभोजकर, प्रशांत मेहता, विज्ञानंद मुंढे, रामचंद्र लोहार, अमोल यादव, विनय चौगुले, बंडोपंत यादव, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ईएसआयएसचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी मिलिंद चौधरी साहेब तसेच विलो मॅथर प्लांट, जाधव इंडस्ट्रीज, मौर्या इंडस्ट्रीजचे कर्मचारी, ईएसआयएस सेवा दवाखान्याचा स्टाफ, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक व गोशिमा कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…