Home Uncategorized सर्व घटकांना विश्वासात घेवून प्रस्तावित सहापदरी रस्त्याच्या जोडरस्त्यांचा आराखडा तयार करावा : आम.राजेश क्षीरसागर

सर्व घटकांना विश्वासात घेवून प्रस्तावित सहापदरी रस्त्याच्या जोडरस्त्यांचा आराखडा तयार करावा : आम.राजेश क्षीरसागर

4 second read
0
0
106

कोल्हापूर दि.२८ : कोल्हापूर जिल्हा हा औद्योगिक क्षेत्रात क्रांती करत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यास जोडणारा कोल्हापूर जिल्हा महत्वाचा दुवा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह शिरोली, गोकुळ शिरगांव या महत्वाच्या औद्योगिक वसाहती आहेत. सद्यस्थितीत केंद्र शासनाच्यावतीने पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु, या औद्योगिक वसाहत क्षेत्रातून प्रस्तावित केलेल्या कामाबाबतीत उद्योजक, वाहतूक संघटनांच्या अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींचे निरसन करून संबधित सर्वच घटकांना विश्वासात घेवून प्रस्तावित सहापदरी रस्त्यास जोडणाऱ्या जोडरस्त्यांचा आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.

राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण करण्याच्या कामासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, औद्योगिक विकास महामंडळ आणि मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशन पदाधिकारी यांची संयुक्तिक बैठक पार पडली.

बैठकीच्या सुरवातीस मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल – हातकणंगले संघटनेच्या शिष्ठमंडळाने उद्भवणाऱ्या समस्या, अडचणी यांची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.

यावेळी सूचना देताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर ते सातारा परिक्षेत्रात सुरु असणाऱ्या सहापदरी रस्त्याच्या कामाशी संबधित अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या दळणवळनातील हा महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यालगत असणाऱ्या कागल पंचतारांकित, शिरोली, गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीमधील उत्पादित होणाऱ्या उत्पादनांची ने- आण, सोबत इतर घटकांचे दळणवळणाचे उपाय हे विनाअडथळा व्हावेत. यासाठी रस्त्याशी संबधित असणाऱ्या सर्व औद्योगिक वसाहतींच्या संघटना, वाहतूक संघटना यांच्या प्रमुखांची येत्या दोन आठवड्यात बैठक घेवून, सर्वांना विश्वासात घेवून महामार्गास जोडणाऱ्या जोडरस्त्यांचा आराखडा तयार करण्यात यावा. त्याचे सादरीकरण सर्वांसमोर करून मंजुरी साठी प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना उपस्थित अधिकारी वर्गास आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.

या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपसंचालक गोविंद, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, कार्यकारी अभियंता श्री नाईक यांच्यासह मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल – हातकणंगले संघटनेचे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष मोहन पाटील आदी संघटनेचे पदाधिकारी, वाहतूक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…