मलकापूर प्रतिनिधी
पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा मोटरसायकल खड्ड्यात आदळून अपघात झाला. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर – आंबा मार्गावरील लव्हाळा या ठिकाणी हॉटेल मॅजेस्टिकच्या जवळील रस्त्यातील खोल खड्ड्यात, मोटार सायकल आढळून अपघात झाला. यावेळी मोटार सायकलवर २ व्यक्ती असून दोघातील एकास रोहित निकम वय वर्षे २५ यास चेहऱ्यास मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून मागील व्यक्ती राहुल निकम वय वर्ष २७ तासगाव यास हाता-पायाला जखम झाली आहे. ही माहिती राहुल निकम यांनी दिली असून, यांना उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते
