Home Uncategorized मलकापूर – येळाने येथे मोटार सायकल व ट्रकचा अपघात

मलकापूर – येळाने येथे मोटार सायकल व ट्रकचा अपघात

4 second read
0
1
1,512


मलकापूर प्रतिनिधी
येळाने येथे मोटर सायकल व ट्रकचा अपघात झाला. एसटी स्टँड शेजारील रस्त्यावर हा शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाला.
शाहुवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येळाने येथील एसटी स्टँड शेजारील कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर शुक्रवारी रात्री ८.३० च्या दरम्यान जयगड ला निघालेला ट्रक क्रमांक के ए २८ अ अ ३६१५ चालक मोनेश कांबर व २९ जळगाव, तालुका सिंदगी व मोटार सायकल स्वार प्रज्वल प्रकाश कांबळे वय २५ सांबू, तालुका शाहुवाडी गाडी क्रमांक एम एच ०९ एफ एक्स ६८१९ हा कोल्हापूर दिशेकडे निघाला असता हा अपघात झाला.

यावेळी गंभीर जखमी मोटरसायकल स्वार प्रज्वल कांबळे यास मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले असता, त्यास गंभीर दुखापत झाल्याने कोल्हापूर सीपीआर रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…