Home Uncategorized रस्त्यातील खड्ड्यात मोटार सायकल कोसळून तरूण गंभीर

रस्त्यातील खड्ड्यात मोटार सायकल कोसळून तरूण गंभीर

2 second read
0
0
411

मलकापूर प्रतिनिधी:

राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यात मोटार सायकल आदळून झालेल्या अपघातात सतिश सवय्याराम पवार (वय ३० वर्षे,रा.तोरविल ता.केसरल जि. बिजापूर)गंभीर जखमी झाला.आज (रविवारी )रात्री साडे आठला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील केर्ले गावानजीक अपघात झाला.श्री पवार मोटार सायकलने (नं. केए २८,ई. डब्लू ३५६३) साखरपा येथून मलकापूरकडे निघाला होता.

तळवडे ते लव्हाळा या दरम्यानचा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. चौपदरीकरणात भराव टाकण्याचे काम सुरू असल्याने धुरळा मोठ्या प्रमाणात असतो. रात्रीत खड्ड्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पवार रस्त्यावर आपटला व डोके रस्त्यावर आपटून मोठा रक्तस्त्राव झाल्याने बेशुद्ध पडला. उजवा खांदाही निकामी झाला. केर्लेचे गणेश पाटील, अशोक कुंभार राजेंद्र लाड यांनी तातडीची मदत करून येथील राष्ट्रीय महामार्गावरील १०३३ या रूग्णवाहीकेव्दारे जखमीस पुढील उपचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालयात रवाना केले.रस्त्याच्या खड्डे दूरूस्तीकडे डोळेझाक करीत असल्याने वाहणधारकातून मोठा असंतोष व्यक्त होत आहे.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…