मलकापूर प्रतिनिधी
वाहनांची गर्दी, माणसांची वर्दळ दुचाकी धारकांची गडबड यावेळीच ब्रेक फेल झालेल्या ट्रक ची एन्ट्री पण सुदैवाने चालकाचे प्रसंगावधान आणि दुचाकी धारकांनी बाळगलेली सतर्कता यामुळेच अनर्थ टाळला. आज दुपारी शाहूवाडी तालुका मलकापूर शहरात ही घटना दुपारी घडली. कोल्हापूर रत्नागिरी- महामार्गावर सतत वाहनांची गर्दी असते याच गर्दीत आज मलकापूर शहरात रत्नागिरीहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाला.

उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून ट्रकची धडक बसली. त्यामुळे ट्रकवरिल चालकाचे नियंत्रण सुटले, ट्रकच्या समोर असलेल्या दुचाकी धारकांनी सतर्कता बाळगून गाडी बाजूला घेतल्याने पुढील मोठा अनर्थ होता होता टळला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या मनात धडकी भरली. घडलेल्या घटनेने महामार्गावर ट्रॅफिक जाम झाले. अपघाताची घटना समजताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुयश पाटील ट्रॅफिक पोलिस, होमगार्ड नारायण पाटील यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते


