मलकापूर प्रतिनिधी
शाहूवाडी येथेल कोर्ट रोड जवळील महालक्ष्मी ऑईल टेडर्स या दुकानाला लागलेल्या आकस्मित आगीत, शेजारी असलेल्या दुचाकी गॅरेज व इतर २ दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे ७० लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. या आगीत ३ दुकाने भस्मसात झाली.

घटना स्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, शाहूवाडी येथे कोर्ट रोड जवळील महालक्ष्मी टेडर्स नावाने खाद्य तेल विक्रीचे दुकान आहे व त्या शेजारी शिवराज टी. व्ही. एस. मोटारसायकल गॅरेज, सखी ब्युटीपार्लर आणि दत्त कृपा हार्डवेअर अशी ४ दुकाने एकाच इमारती मध्ये आहेत. या पैकी महालक्ष्मी टेडर्सचे मालक महेश शामराव पाटील राहनार माण ता. शाहुवाडी हे दुकानात लक्ष्मीपूजन करून, दुकान बंद करून घरी गेले होते. तसेच शेजारील ३ दुकाने बंद होती.
दरम्यान बंद असलेल्या महालक्ष्मी टेडर्स दुकानातुन धूर निघत असल्याचे समोरील दुकानात उभ्या असलेल्या नागरीकांच्या निदर्शनात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ घर मालकाना याची सुचना दिली. दुकानात खाद्य तेलाचे डबे, प्लॅस्टिक कॅन व तेलाचे बॅरेल असा माल असल्याने आगणीने मोठ्या प्रमात पेट घेतला. त्यावेळी शेजारी असलेल्या शिवराज टी. व्ही. एस. चे मालक संजय बाळू कुंभार रा. बांबवडे यांच्या गॅरेज मधील विक्रीसाठी आणलेली नवीन दुचाकी गाडी व रीपेरसाठी आलेल्या ८ वे ९ मोटारसायकल गाडयांनी पेट घेतला. दोन्ही ठिकाणी ज्वलनशील पदार्थ असल्याने आग भडकत होती. या आगीत खाद्य तेलासह, मोटरसायकल, स्पेअर पार्ट, लॅपटॉप व अन्य साहित्य जळून खाक झाले.

दत्त कृपा हार्डवेअर या दुकानातील पीव्हीसी पाईप सह अन्य साहित्य जळाले. या आगीत सखी ब्युटी पार्लर मधील साहित्य जळून खाक झाले. घटना स्थळी मलकापूर नरपरिषद अग्निशमन गाडी तात्काळ दाखल झाली व आग आटोक्यात आणली यावेळी मलकापूर नगर परिषदेचे अग्निशमन चे कर्मचारी विठोबा वारकरी, गणेश पांढरबळे, शाहिद मिस्त्री, दीपक सनगर यांनी आग आटोक्यात आणली.